ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

सायबर सुरक्षा अभियानात एमआयटी एसीएससी, आळंदीची उल्लेखनीय प्रगती

आळंदी, पुणे | डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, युवक आणि समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा – अर्न अँड लर्न २०२६–२७’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत एमआयटी एसीएससी, आळंदीच्या वतीने विविध सायबर सुरक्षा आणि फसवणूक प्रतिबंधक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून एमआयटी एसीएससीच्या सायबर वॉरियर टीमने विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि समुदायांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला. सायबर धोके ओळखणे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेणे याबाबत प्रत्यक्ष उदाहरणे, संवादात्मक चर्चा आणि प्रकरण अभ्यासाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानादरम्यान ओटीपी फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक, मजबूत संकेतशब्द, द्वि-घटक प्रमाणीकरण, समाजमाध्यमांची सुरक्षितता, डिजिटल पाऊलखुणा, ऑनलाइन गेमिंग, यूपीआय व क्यूआर कोड फसवणूक, मोबाईल ॲप सुरक्षितता, सायबर बुलिंग आणि ऑनलाइन गोपनीयता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यात आली. सायबर फसवणूक झाल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधणे आणि अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कामगिरीत उल्लेखनीय प्रगती

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा – अर्न अँड लर्न २०२६–२७ च्या महाविद्यालयीन कामगिरी अहवालानुसार, एमआयटी एसीएससी, आळंदीने सादरीकरणातील कामगिरीमध्ये १०० टक्के, परिणामकारकतेमध्ये ९३.१३ टक्के आणि अनुपालनामध्ये ९२.३ टक्के कामगिरी नोंदवली आहे.

हेही वाचा

इलेक्ट्रिक मोबिलिटी हीच भविष्यातील वाहतुकीची दिशा; आमदार शंकर जगताप

याशिवाय जनसमुदायापर्यंत पोहोचण्यामध्ये ७० टक्के, माध्यम प्रसिद्धीमध्ये ७३.३३ टक्के, उपलब्धीमध्ये ७६.८० टक्के, अंतर्गत व बाह्य सामूहिक उपक्रमांमध्ये ५० टक्के आणि फसवणूक प्रतिबंधक सक्रियता उद्दिष्टामध्ये २९ टक्के प्रगती साधली आहे.

ही कामगिरी सायबर वॉरियर टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या प्रत्यक्ष जनजागृती उपक्रमांचे फलित आहे. विद्यार्थ्यांपासून कामगार समुदायापर्यंत समाजातील विविध घटकांमध्ये सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या अभियानाला क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम आणि सहयोगी संचालक मा. श्री. अजय शिर्के सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे.

तसेच एमआयटी एसीएससी, आळंदीचे फॅकल्टी कोऑर्डिनेटर मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर वॉरियर टीमच्या विविध जनजागृती उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे.

“माझा डेटा, माझी जबाबदारी” हा संदेश विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवत सजग नागरिक, सुरक्षित डिजिटल भविष्य आणि सुरक्षित भारत घडविण्याच्या दिशेने एमआयटी एसीएससी, आळंदीची सायबर वॉरियर टीम सातत्याने कार्यरत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button