ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इलेक्ट्रिक मोबिलिटी हीच भविष्यातील वाहतुकीची दिशा; आमदार शंकर जगताप

उद्योग विश्व : पुनावळेत ‘NIA EV Excellence Centre’चे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड | पुनावळे येथे ‘NIA EV Motors’च्या नवीन ‘NIA EV Excellence Centre’चे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील भारतीय कंपन्यांच्या वाढत्या योगदानाचे कौतुक करत, इलेक्ट्रिक मोबिलिटी ही भविष्यातील वाहतुकीची महत्त्वाची दिशा असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी नमूद केले.

भारतीय रस्ते, ग्राहकांच्या गरजा आणि बदलते तंत्रज्ञान यांचा विचार करून आधुनिक, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याच्या दिशेने NIA EV Motorsकडून काम सुरू आहे. वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार ही केवळ पर्यावरणाची गरज नसून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा बदल असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

NIA EV Motorsची स्थापना २०२४ मध्ये करण्यात आली. कंपनीकडून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांसाठी सुरक्षित, स्मार्ट आणि विश्वासार्ह वाहने विकसित करण्यावर भर दिला जात आहे. LFP बॅटरी, IoT कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सेफ्टी तंत्रज्ञान यामुळे कंपनीची इलेक्ट्रिक वाहने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम होत आहेत.

हेही वाचा

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर

इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार केवळ वाहन उद्योगापुरता मर्यादित राहणार नसून त्यातून बॅटरी तंत्रज्ञान, चार्जिंग सुविधा, वाहन देखभाल, सॉफ्टवेअर आणि कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राची ऑटोमोबाईल क्षेत्रातील मजबूत पायाभूत क्षमता आणि EV क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याची मोठी संधी राज्यासमोर असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

NIA EV Motorsकडून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात डीलर नेटवर्कचा विस्तार करण्यात येत असून, एक मजबूत भारतीय EV ब्रँड म्हणून कंपनीची वाटचाल सुरू आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन परवडणारी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे आमदार शंकर जगताप यांनी कौतुक केले. यावेळी नगरसेविका रेश्मा भुजबळ, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष चेतन भुजबळ उपस्थित होते.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आलोक शेठ यांचे अभिनंदन करून कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी अशा स्वदेशी कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, NIA EV Motors इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

इलेक्ट्रिक मोबिलिटी ही केवळ काळाची गरज नाही, तर भारताच्या भविष्यातील वाहतुकीची दिशा आहे. वाढते प्रदूषण, इंधनावरील खर्च आणि पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक आणि ऑटोमोबाईल हबमध्ये NIA EV Motorsसारख्या भारतीय कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वदेशी EV उद्योगाला बळ देणे ही अभिमानाची बाब आहे. LFP बॅटरी, IoT कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी अशा उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. NIA EV Motorsच्या या नव्या ‘EV Excellence Centre’मुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला आणि त्यासोबत रोजगार व पूरक उद्योगांना निश्चितच चालना मिळेल.

– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button