TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश? 4 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं आवाहन

हैदराबाद गॅझेटनुसार सापडलेल्या 58 लाख नोंदींच्या आधारे अर्ज करण्याचे निर्देश; 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये नोंदींची यादी

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातून मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेले. या चर्चेनंतर 4 सप्टेंबरपासून पात्र मराठा नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि मकरंद पाटील यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. हैदराबाद गॅझेटनुसार सापडलेल्या नोंदी, रक्ताचे नाते आणि कुळाच्या आधारे ज्या नागरिकांच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा –  “जेव्हा केव्हा काही होत राहिल, तेव्हा कळत राहिल”; ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य

58 लाख नोंदींच्या आधारे अर्ज करण्याचे आवाहन

हैदराबाद गॅझेटनुसार सापडलेल्या 58 लाख नोंदींच्या आधारे संबंधित नागरिकांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज करावा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध नोंदींची यादी लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरळीत आणि वेगाने पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. अर्ज करताना किंवा प्रमाणपत्र मिळवताना अडचणी आल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सातारा, कोल्हापूर गॅझेटसाठीही मागणी

दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर सातारा आणि कोल्हापूर गॅझेटसंदर्भातही सरकारने जीआर काढावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी मंत्र्यांकडे केली आहे. मराठा समाजाच्या सापडलेल्या नोंदींना व्हॅलिडिटी देण्यासह इतर मागण्यांसाठी जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे.

मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर आता 4 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group