Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

यशच्या ‘टॉक्सिक’ची बॉक्स ऑफिसवर हवा; ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ३० कोटींचा टप्पा पार

Toxic Advance Booking | दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू केली आहे. बोल्ड कथानक, इंटिमेट सीन्स आणि सेन्सॉर बोर्डाकडून मिळालेले ‘A’ प्रमाणपत्र यांमुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून देशांतर्गत ३० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.

गीतू मोहनदास दिग्दर्शित या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मूळ कन्नड आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने कन्नड आणि हिंदी या दोन्ही व्हर्जनमध्ये प्रत्येकी १० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा

गिनीच्या राजधानीत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर कोसळून २२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

थेट तिकीट विक्रीतून चित्रपटाने २३.९१ कोटींची कमाई केली असून, ब्लॉक बुकिंगसह हा आकडा ३२.५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कर्नाटकात बंगळुरूमध्ये सर्वाधिक तिकीट विक्री झाली असून तेथील ७० टक्क्यांहून अधिक शो हाऊसफुल्ल झाले आहेत. दुसरीकडे, हिंदी व्हर्जननेही 2D फॉरमॅटमध्ये ३.१८ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री करत १०.८४ कोटींचा व्यवसाय केला आहे.

ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार, ‘टॉक्सिक’ पहिल्याच दिवशी जगभरात १०० ते १२० कोटी रुपयांची बंपर ओपनिंग करू शकतो. तसे झाल्यास, ‘केजीएफ’ फेम यश हा जागतिक बॉक्स ऑफिसवर सलग तीन वेळा १०० कोटींची ओपनिंग देणारा प्रभासनंतरचा दुसरा भारतीय अभिनेता ठरेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button