TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

नितीन गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे’

कोरोनानंतर आरोग्याकडे लक्ष; रोज व्यायाम आणि प्राणायाम करण्याचा तरुणांना दिला सल्ला

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या पिढीला संधी देण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही. ज्या वेळी काम करू शकलो, तेव्हा केले. आता कामातील माझा सहभाग कमी झाला आहे. नव्या पिढीच्या हाती काम दिले पाहिजे,” असे गडकरी यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काटोल येथे ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गडकरी यांनी आत्मविकास आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. नवीन पिढीतील लोक पुढे आले असून, जुने कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे हळूहळू कामाचा विस्तार पुन्हा वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या जुन्या जीवनशैलीचा किस्सा सांगताना गडकरी म्हणाले की, पूर्वी पक्षाचे काम करताना जीवनशैली बेशिस्त होती. समोसा खाऊन रात्री झोपण्यापासून ते स्कूटरवर चार जणांनी प्रवास करण्यापर्यंतचे अनुभव त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  महाराष्ट्र केसरी २०२६-२७ची लढत नागपुरात; महिला महाराष्ट्र केसरी वाशिममध्ये

मात्र, कोरोनानंतर आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या दररोज सकाळी व्यायाम आणि प्राणायाम करत असल्याचे त्यांनी सांगितले. “सर्वांनी रोज किमान अर्धा तास व्यायाम आणि प्राणायाम केला पाहिजे. तब्येत चांगली असेल तरच आयुष्यातील सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा उपयोग आहे,” असे गडकरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सामाजिक कार्याचे महत्त्व स्पष्ट करताना गडकरी यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास केल्यानंतर गरीब आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी वेळ द्यावा, असे ते म्हणाले.

“राज्यातील एकाही आदिवासी गावात अंधार राहू नये, प्रत्येक गावात उजेड झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे,” असे आवाहनही गडकरी यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group