Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसला; अंगठी लंपास करून साधू पसार!

पिंपरी-चिंचवड | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसलेल्या एका अनोळखी साधूने आशीर्वाद देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात अनोळखी साधूविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे १.२५ वाजण्याच्या सुमारास मनपा आयुक्त बंगल्यासमोरील रस्ता, मोरवाडी, पिंपरी ते एचडीएफसी बँक, पूर्णानगर, चिंचवड या दरम्यान घडली. फिर्यादी अभिजीत रामचंद्र पाटील (वय ४९, रा. बेलठिकानगर, थेरगाव) हे कारमधून जात असताना एका अनोळखी साधूने लिफ्ट मागितली.

हेही वाचा

यशच्या ‘टॉक्सिक’ची बॉक्स ऑफिसवर हवा; ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ३० कोटींचा टप्पा पार

कारमध्ये बसल्यानंतर त्याने आपण नागा साधू असल्याचे सांगितले. तसेच आपल्या आशीर्वादामुळे भरभराट व सुख-समाधान मिळेल, असे सांगून पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पाटील यांना हातातील सोन्याची अंगठी काढण्यास भाग पाडले. अंगठी डोळ्यांना लावून ती कारच्या गिअरशिफ्टजवळ ठेवत असल्याचा भास त्याने केला. मात्र, अंगठी तेथे न ठेवता स्वतःजवळ ठेवून तो पसार झाला.

या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१६ व ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधित साधूचा शोध सुरू आहे.

संशयिताचे वर्णन : अंगाने जाड, उंची सुमारे ५.५ फूट, डोके मोठे, काळासावळा रंग, अंगात भगवे वस्त्र, डोक्यावर फेटा, हातात मोठे कडे असून तो हिंदी भाषेत बोलत होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार होनमाने करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button