Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

१९८४ च्या शीख दंगलीतील आरोपी सज्जन कुमार यांचा कारावासात मृत्यू

Sajjan Kumar | काँग्रेसचे माजी खासदार आणि १९८४ च्या दिल्ली शीख विरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार (वय ८० वर्षे) यांचे तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना निधन झाले. तब्येत खालावल्याने त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये सज्जन कुमार यांना एका शीख कुटुंबातील पाच जणांची हत्या करणे, गुन्हेगारी कट रचणे, शत्रुत्व वाढवणे आणि सामाजिक सलोखा बिघडवल्याच्या आरोपांखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर, १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या कुटुंबाला जिवंत जाळणाऱ्या हिंसक जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर २०२५ मध्ये त्यांना पुन्हा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

हेही वाचा

कचऱ्याच्या प्रश्नावर भाजपा नगरसेवकांनी स्थायी समितीत प्रशासनाला घेरले..!

जानकीपुरी प्रकरणात झाले होते दोषमुक्त

जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने त्यांना १९८४ च्या जानकीपुरी दंगल प्रकरणातून पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. या प्रकरणात जमावाचे नेतृत्व केल्याचा गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांना दिलासा मिळाला होता; मात्र इतर प्रकरणांमधील जन्मठेपेमुळे ते तिहार तुरुंगातच शिक्षा भोगत होते.

१९८४ च्या दंगलीची पार्श्वभूमी

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकांकडून हत्या झाल्यानंतर दिल्लीसह देशभरात शीख विरोधी दंगली उसळल्या होत्या. या भीषण हिंसाचारात २,७०० हून अधिक शीख नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button