ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक!

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

– नसबंदी, लसीकरणासह २४ तास हेल्पलाइनची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणे कठीण झाले असून, नागरिकांवर श्वानदंशाच्या गंभीर घटना घडत असतानाही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.

शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी भोईर यांनी केली.

शहरातील सर्व प्रभागांमध्ये भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि अँटी-रेबीज लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात आली. तसेच नागरिकांवर हल्ले करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणीही करण्यात आली.

हेही वाचा –  भंडाऱ्यात उद्योगांना चालना; २० उपलब्ध भूखंड उद्योजकांना तातडीने देण्याचे उदय सामंतांचे निर्देश

श्वानदंशाच्या घटना घडल्यानंतर नागरिकांना उपचारासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस आणि अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा २४ तास उपलब्ध ठेवावा, अशी मागणी भोईर यांनी केली. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र २४×७ हेल्पलाइन सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

“पिंपरी-चिंचवडकरांचा हा जीवघेणा त्रास आणि दहशतीचे वातावरण आता खपवून घेतले जाणार नाही. करदात्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला हा थेट इशारा आहे,” असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाने पुढील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भोईर यांनी दिला. “नागरिकांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता जागे करण्याची वेळ आली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना भटक्या कुत्र्यांची भीती वाटत असेल, तर ही प्रशासनाची मोठी नामुष्की आहे. नसबंदी, लसीकरण आणि आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करा. आता आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी; अन्यथा महापालिकेच्या दारात यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडू.”

— भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group