Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसला मोठा धक्का, तर भाजपाचा मार्ग सुकर! मतदारसंघ फेररचना विधेयकाला एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचा पाठिंबा

नवी दिल्ली | संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात (३० नोव्हेंबरपासून लोकसभा आणि २ डिसेंबरपासून राज्यसभा) सादर होणाऱ्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना (Delimitation) घटनादुरुस्ती विधेयकावरून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा मिळण्याचे संकेत असतानाच, दुसरीकडे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमके (द्रमुक) पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चेन्नई येथे स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला असून, यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा मार्ग सुकर झाला आहे, तर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

चेन्नईतील बैठकीनंतर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “आम्ही काँग्रेससोबत असो वा नसो, किंवा सत्तेत असो वा नसो; आमची एकच ठाम मागणी राहिली आहे की, लोकसभेतील तमिळनाडूचा ७.१८ टक्के जागांचा वाटा बदलला जाऊ नये. नव्या विधेयकात तो सध्या तसाच राखला गेला आहे. अर्थात काही प्रक्रियात्मक प्रश्न आहेत, त्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि गरज पडल्यास दुरुस्तीही सुचवू.”

हेही वाचा

मुंबईत १ डिसेंबरला रंगणार ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२६’; ना.डॉ.उदय सामंत प्रमुख पाहुणे!

मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या टीकेला स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

यापूर्वी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत एम.के. स्टॅलिन यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना स्टॅलिन यांनी विरोधकांचा उल्लेख ‘विश्वासघातकी’ असा केला होता. “देशातील एकूण लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवली गेली तरी तमिळनाडूचे सध्याचे ७.१८ टक्के प्रतिनिधित्व कमी होता कामा नये, हीच आमची आग्रही भूमिका होती. दक्षिणेकडील राज्यांच्या न्याय्य पुनर्रचनेसाठी सर्वप्रथम द्रमुकनेच आवाज उठवला होता,” असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले होते. आता तमिळनाडूच्या प्रमुख अटी मान्य झाल्याने द्रमुकने विधेयकाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group