टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा कोंडी। दि.१९ ऑगस्ट २०२६ : मोशी कचरा डेपोत एकाच दिवसात १ हजार २८० टन कचऱ्याचे संकलन

'ज' आणि 'ल' क्षेत्रीय कार्यालयांची सर्वाधिक कामगिरी; 'अ' प्रभाग क्षेत्रात सर्वात कमी नोंद

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी  : महापालिका हद्दीतील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी शहरातील विविध दहा क्षेत्रीय कार्यालयांमधून तब्बल १२८०.३३ टन इतक्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले. डेपो येथील वजनकाट्यावर नोंदवलेल्या अधिकृत आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘एजी एन्व्हायरो’ आणि ‘बीव्हीजी’ या दोन एजन्सींच्या माध्यमातून ट्रक, कॉम्पॅक्टर, कॅप्सूल आणि टाटा एस वाहनांच्या साह्याने विविध प्रभागांतून कचरा गोळा करून तो मोशी डेपोत आणला जातो. दिवसभरात सुमारे १५० हून अधिक वाहनांच्या फेऱ्यांची नोंद वजनकाट्यावर करण्यात आली.

दरम्यान, दि. ८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपो येथे अतिवृष्टी झाल्यामुळे कचऱ्याचा डोंगर कोसळला. त्यामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारत कोलमडली आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकून ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या ४०-४२ दिवसांत शहरात नियमित १४०० ते १५०० टन कचरा संकलित केला जातो आणि तो कचरा मोशी डेपोवर टाकला जात आहे.

परिणामी, नव्याने आणखी ६० हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. यावर काय उपाययोजना आहेत? कोणती धोरणात्मक भूमिका प्रशासनाने घेतली याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी किंवा लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नाहीत.  त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची कचरा कोंडी झालेली आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय कचरा संकलन (टनांमध्ये)

क्षेत्रीय कार्यालयकचरा (टन)
ज (J)२४७.०५
ल (L)२२१.१९
ग (G)१४३.३०
क (C)१३२.११
फ (F)११९.४०
इ (E)११९.२४
ड (D)११३.९०
ह (H)८२.९६
ब (B)६१.५८
अ (A)३९.६३

‘ज’ क्षेत्रीय कायालर्याअंतर्गत सार्वाधिक कचरा संकलन

सर्वाधिक कचरा संकलनाची नोंद ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाली असून, येथून तब्बल २४७ टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. या क्षेत्रात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक १६ आणि २५ मधून मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्यात आला, ज्यासाठी एजी एन्व्हायरो एजन्सीच्या असंख्य कॉम्पॅक्टर गाड्यांच्या फेऱ्या दिवसभर सुरू होत्या.

त्याखालोखाल ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयातून सुमारे २२१ टन कचरा जमा झाला. या भागात प्रभाग ६, ७, ८ आणि २० मधून बीव्हीजी एजन्सीमार्फत मोठ्या क्षमतेच्या कॉम्पॅक्टर व कॅप्सूल वाहनांतून कचरा वाहतूक करण्यात आली.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वात कमी नोंद

याउलट, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वात कमी म्हणजे केवळ सुमारे ४० टन कचरा संकलित झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ ‘ब’ क्षेत्रातून सुमारे ६२ टन कचरा गोळा करण्यात आला.

प्रभागनिहाय कचरा संकलन (प्रभाग १ ते ३२)

क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारीखेरीज, वजनकाट्याच्या नोंदींमधील “कचरा गोळा केलेल्या प्रभागाचे नंबर” या रकान्याच्या आधारे प्रभागनिहाय कचरा संकलनाचे विश्लेषण करण्यात आले. (टीप: ज्या फेऱ्यांमध्ये एकाच वाहनाने एकापेक्षा अधिक प्रभागांतून कचरा गोळा केला, अशा नोंदींमधील एकूण वजन संबंधित प्रभागांमध्ये समान प्रमाणात विभागून अंदाजे आकडेवारी काढण्यात आली आहे.)

प्रभाग क्र.कचरा (टन)प्रभाग क्र.कचरा (टन)
४०.८९१७३२.४०
५४.८४१८१७.६१
९०.०५१९११.५८
१८.२८२०६४.६५
१०.९१२१४६.५०
४१.३६२२११.१५
४७.६८२३८०.०८
७१.६६२४१९.५५
३८.००२५१४२.१९
१०३७.५६२६४०.८८
११४२.३९२७१७.७१
१२३६.१२२८२९.४५
१३७.८८२९१२.७१
१४२०.२४३०२७.८५
१५११.५१३१२५.७८
१६१०१.६०३२२९.३३

यातून प्रभाग क्रमांक २५ मध्ये सर्वाधिक (सुमारे १४२ टन) तर प्रभाग क्रमांक १६ (सुमारे १०२ टन) आणि प्रभाग क्रमांक (सुमारे ९० टन) मध्येही मोठ्या प्रमाणात कचरा संकलित झाल्याचे दिसते. याउलट प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वात कमी, अवघा सुमारे ८ टन कचरा गोळा करण्यात आला.

एजन्सी व वाहनांसमोरील आव्हाने :

दिवसभरात ‘एजी एन्व्हायरो’ आणि ‘बीव्हीजी’ या दोन्ही एजन्सींच्या ट्रक व कॉम्पॅक्टर वाहनांनी सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत मोशी डेपोकडे फेऱ्या मारल्या. काही कॉम्पॅक्टर व कॅप्सूल वाहनांनी एकाच दिवसात तीन ते चार वेळा डेपोत येऊन कचरा रिकामा केल्याची नोंद वजनकाट्याच्या आकडेवारीत आढळते, जे शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुरळीत व सातत्याने कार्यरत असल्याचे दर्शवते. एकूणच, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज सरासरी सुमारे १२८० टन कचऱ्याचे संकलन व शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जावी, अशी अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button