Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

UGC-NET ची ३ विषयांची परीक्षा पुन्हा होणार; NTA कडून वेळापत्रक जाहीर

UGC-NET | जूनमध्ये झालेल्या यूजीसी नेटच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयाच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलं आहे. एका समितीला या तिन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक तथ्यात्मक, टायपिंगच्या आणि भाषांतराच्या चुका आढळल्या, तसंच मागील परीक्षांमधील मोठ्या प्रमाणावर प्रश्न जसेच्या तसे पुन्हा विचारण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे या प्रश्नपत्रिका “न्याय्य आणि त्रुटीमुक्त परीक्षेच्या” मानकांनुसार नव्हत्या, असा निष्कर्ष समितीने काढला.

एनटीएने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केलं आहे की, ही पुनर्रचना परीक्षा ९ आणि १० सप्टेंबर रोजी घेतली जाईल. या तीन विषयांच्या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांकडून कोणतंही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही. इंग्रजीचा पेपर ९ सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल, तर वाणिज्यचा पेपर त्याच दिवशी शिफ्ट २ मध्ये दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत घेतला जाईल. समाजशास्त्राचा पेपर १० सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल.

हेही वाचा

सोसायटी कारभारात पारदर्शकतेसाठी डॉ. सुहास कांबळे यांचा अभिनव उपक्रम

एनटीएच्या माहितीनुसार, समितीच्या अहवालात या तीन प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, टायपिंगच्या आणि भाषांतराच्या चुका नोंदवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रख्यात विद्वानांच्या नावांचे चुकीचे स्पेलिंग, पुस्तकांची चुकीची किंवा विस्कळीत शीर्षके, प्रश्नांच्या रचनेतील चुका, व्याकरणाच्या चुका, लिंग आणि वचन संदर्भातील त्रुटी, विरामचिन्हांच्या चुका आणि प्रस्थापित संकल्पनांसाठी अमानक संज्ञांचा वापर यांचा समावेश होता. समितीला असंही आढळलं की, मागील परीक्षांमधील अनेक प्रश्न पुन्हा विचारले गेले होते. मूळ यूजीसी-नेट परीक्षा २२ ते ३० जून दरम्यान ८७ विषयांसाठी घेण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारांनी केलेल्या तक्रारींवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठीची पात्रता ठरवते, तसंच पीएचडी प्रवेशासाठीही याचा वापर केला जातो.

यूजीसी-नेटचा हा ताजा वाद नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी अत्यंत कठीण वेळी आला आहे. भारतातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या या संस्थेच्या विश्वासार्हतेवर आणि क्षमतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी ‘नीट-यूजी’ (NEET-UG) पेपरफुटीच्या वादामुळे अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. या यूजीसी-नेटमधील आरोपांचे स्वरूप पेपरफुटीपेक्षा वेगळे असले, तरी यामुळे गेल्या काही वर्षांत यूजीसी-नेटला लागलेलं विघ्न अधिकच वाढले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button