ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरात सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवेचा नवा अध्याय!

‘व्हाईटलिटी हेल्थकेअर’ व ‘गॅस्ट्रो वर्ल्ड क्लिनिक’चे उद्घाटन

– तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडसह निगडी परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मिलेनिया टॉवर येथे ‘व्हाईटलिटी हेल्थकेअर’ आणि ‘गॅस्ट्रो वर्ल्ड क्लिनिक’ या सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्यास चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके तसेच विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, डॉ. सुधीर पाटील, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे, नगरसेवक जितेंद्र ननवरे, नगरसेविका वर्षाताई जगताप, माजी प्रभाग समिती सदस्य कुणाल लांडगे, NIMAचे माजी अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील, अशोक पगारिया, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ बुट्टे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश भोईर, फॅशन असोसिएशनचे अध्यक्ष अजित पाटील, डॉ. सारिका भोईर, SPDS संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप ननावरे, पतित पावन संघटनेचे माजी शहराध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते राजेश मोटे, डॉ.संजीव कुमार पाटील, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा –  महाराष्ट्रात पावसाची तूट कायम; १४ जिल्ह्यांत २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट

या वेळी Army Rowing Nodeचे कर्नल रामकृष्णन, Team India Coach सुभेदार मेजर राजेश यादव, सुभेदार विकल सारवे, सुभेदार लवकुमार, सुभेदार लोकेश कुमार आणि सुभेदार आझाद यांचीही उपस्थिती होती. गॅस्ट्रो वर्ल्डचे संस्थापक डॉ. मनोज कोल्हे, व्हाईटलिटी हेल्थकेअरचे सहसंस्थापक डॉ. महेश शेटे, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दीपक गोरे, प्रसिद्ध सर्जन डॉ. महेश जाधव आणि कार्यालॉजिस्ट डॉ. अजिंक्य बोराडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

निगडी व परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा लवकरात लवकर आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा या क्लिनिकचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उपचारांसाठी नागरिकांना शहरातील विविध भागांत जाण्याची गरज कमी होऊन एकाच ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

जर्मनीतील संशोधन संस्थेत निवड झालेल्या गोरे यांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान अर्णव दीपक गोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांची जर्मनीतील प्रसिद्ध Max Planck Institute of Molecular Medicine येथे पूर्ण शिष्यवृत्ती व वर्क कॉन्ट्रॅक्टसह निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी डॉक्टर समाजसेवेशी कसे बांधील आहेत, याचा उल्लेख करत नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आमदार सुनील शेळके यांनीही डॉक्टरांची समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करत नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. उपस्थित आमदार, नगरसेवक आणि मान्यवरांनी व्हाईटलिटी हेल्थकेअर व गॅस्ट्रो वर्ल्ड क्लिनिकच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सेवा निगडी परिसरात उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“निगडी आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा त्यांच्या घराजवळच, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे, हा व्हाईटलिटी हेल्थकेअरचा मुख्य उद्देश आहे. उपचारासाठी नागरिकांना दूर जावे लागू नये, तसेच वेळेवर योग्य निदान आणि उपचार मिळावेत, यासाठी आम्ही विविध वैद्यकीय तज्ज्ञांची सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सेवा केवळ व्यावसायिक उपक्रम न राहता समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने एक जबाबदारी म्हणून आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.”

— डॉ. महेश शेटे, सहसंस्थापक, व्हाईटलिटी हेल्थकेअर.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button