ताज्या घडामोडीपुणे

नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ऑगस्ट उत्साहात साजरा

मावळ | नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विप्रो टेक्नॉलॉजीचे माजी जनरल मॅनेजर व माजी ग्लोबल प्लेसमेंट हेड सतीश रानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सल्लागार महेशभाई शहा, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सतीश रानडे यांनी मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अद्ययावत कौशल्ये आत्मसात करावीत आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचा भाजपमध्ये प्रवेश

संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे यांनी स्वातंत्र्य दिन हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्याचा दिवस असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्ये जपत देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचे महत्त्व जपत राष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

रुद्रा राजगुरे, राम पंडित खापे यांचा विशेष सत्कार

यावेळी नासा आणि इस्रो भेटीसाठी थेट निवड झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी रुद्रा राजगुरे आणि राम पंडित खापे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मावळ तालुक्याचे नाव देश-विदेशात उज्ज्वल झाले असून, संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विता काजळे आणि विद्यार्थी देवदत्त दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन निबंधक विजय शिर्के, डॉ. शहुराज साबळे, डॉ. अनुज खोंड, प्रा. नेहा भागवत, सौ. प्रीती घुले, प्रा. नूतन पाटील आणि प्रा. धीरज पाटील यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button