ताज्या घडामोडीपुणे

यश मिळाल्यानंतर संस्कार, विवेक आणि नम्रता जपावी – शास्त्रज्ञ के. व्ही. कोकिळ

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्यदिन साजरा

पिंपरी, पुणे  :  फळांनी बहरलेले वृक्ष जसे नम्रतेने झुकतात, त्याप्रमाणे ज्ञान व कर्तृत्व प्राप्त झाल्यानंतरही व्यक्तीने नम्र राहिले पाहिजे. यश मिळाल्यानंतर संस्कार, विवेक आणि नम्रता जपावी असे मार्गदर्शन डीआरडीओ चे शास्त्रज्ञ के. व्ही. कोकिळ यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये शनिवारी, स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोकिळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जोपासत विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे प्राचार्या डॉ. बिंदू सैनी सांगितले.

हेही वाचा –  वाकडमध्ये ६०० हून अधिक नागरिकांना मोफत NCMC स्मार्ट कार्डचे वाटप

यावेळी उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी,सुलोचना पवार, दीपक बल्लाल, क्रांती कुलकर्णी, श्रुती दिवटे, धनाजी पाटील, चंद्रकांत ठिंबरे, रमेश नंदाला, अंकित तांबे, श्रीकांत देशपांडे, प्रिया सूर्यवंशी, गौरी उत्तुरे,अजय चावरिया, सुजाता भोईटे, क्रांती कुलकर्णी, ट्रीझा पीटर्स, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

विद्यार्थी रुद्रांश भोंडवे, विदिशा ठाकूर, समृद्धी नायक स्वातंत्र्यदिनाचे महत्व सांगितले. साक्षरता व व्यसनमुक्त भारत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती गीत सादर केले. नवसाक्षरता अभियानांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निर्मला कांबळे, सुनीता घाडगे, अनिता साबणे आणि स्मिता खुराडे यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सूत्र संचालन जुई भोंडवे, पार्थ कुलकर्णी, अनुष्का पाधियार, तनिष्का नेहरे, यांनी केले. स्वर्णिमा कुलकर्णी हिने आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button