Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! ‘विमल’च्या जाहिरात प्रकरणी शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस

मुंबई | महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’च्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या तिन्ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत याबाबत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात तंबाखू, निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर कायदेशीर बंदी आहे. तरीही विमल ब्रँडच्या ‘इलायची’ उत्पादनाच्या नावाखाली प्रतिबंधित पान मसाल्याचे अप्रत्यक्ष (सरोगेट) प्रमोशन करण्यात आल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर आले आहे. या तिन्ही कलाकारांना या जाहिरातीतील आपला सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स तसेच वेबसाइट्सवरून सर्व आक्षेपार्ह प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “तुमच्यावर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये?” अशी विचारणा करत नोटीस पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा

राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण; दर्जेदार आरोग्यसेवेसाठी शासन कटिबद्ध

१५ दिवसांत स्पष्टीकरण देण्याची मुदत; आयुक्तांची धडक कारवाई

एफडीए आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात बेकायदा गुटखा आणि पान मसाला विक्रीवर धडक छापासत्र सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून एफडीएने अजय देवगणच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यावर आणि टायगर श्रॉफच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर प्रत्यक्ष नोटीस पाठवली आहे. विमलची ‘बोलो जुबाँ केसरी’ ही जाहिरात प्रचंड चर्चेत राहिली होती, मात्र आता तीच जाहिरात या तिन्ही अभिनेत्यांसाठी कायदेशीर अडचणीचे कारण ठरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button