Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण; दर्जेदार आरोग्यसेवेसाठी शासन कटिबद्ध

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; कोल्हापुरात एआय आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटरची सुरुवात

कोल्हापूर : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ७४ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डी ग्रामीण रुग्णालयाचेही दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

राज्यातील सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याला तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  महाडीबीटीवर आणखी २९ योजनांचा समावेश; योजनांची संख्या १०५ वर

पालकमंत्री आबिटकर यांनी वैद्यकीय यंत्रसामग्रीअभावी बंद असलेल्या अनेक आरोग्य संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजना पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असून, आर्थिक अडचणीमुळे कोणताही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोल्हापुरात एआय आधारित आरोग्य कमांड सेंटर

यावेळी महा पल्स-एआय प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटरच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १०४ शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच ८२ प्राथमिक आरोग्य केंद्रे एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहेत.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, कोल्हापुरातील यशस्वी अंमलबजावणीनंतर तो टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे नियोजन आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button