Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नाशिक जिल्ह्यातील ३९ अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्रे

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहणानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्ती; जिल्ह्यात अनुकंपेचे एकही प्रकरण प्रलंबित नसल्याची माहिती

नाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील ३९ अनुकंपाधारकांना विविध शासकीय विभागांत नियुक्ती देण्यात आली. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी; वेल्सवर ३-१ ने मात

अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळालेल्यांमध्ये शितल प्रतापपुरी गोसावी, साधना रमेश बनकर, शैलेश अशोक दराडे, यश विश्वनाथ कुन्हाडे, कोमल अशोक शिंदे, हेमंत मारुती भाकरे, मयुर परशुराम सायखेडे, सिद्धेश मनेश पोतदार, नेहा योगेश गवळी, निरज पुरुषोत्तम परदेशी, मंगेश संजय पाटील, अश्विनी नरेश चौधरी, शुभम संदिप निकम यांच्यासह एकूण ३९ जणांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविकात नाशिक जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वावरील एकही प्रकरण सध्या प्रलंबित नसल्याची माहिती दिली. प्रशासनाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केल्याने संबंधित कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाला अनुकंपाधारकांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्ती मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button