Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सरकारने ‘वाघ’ कधीच मारून टाकला; राज ठाकरेंची निवडणूक आयुक्तांवर टीका

मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, उमेदवारांना बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली होती. या निर्णयावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली आहे.

ईव्हीएम मशीनला PADU (Printing Auxiliary Display Unit) हे मशीन जोडले जाणार आहे. या मशीनची कोणत्याही राजकीय पक्षाला कल्पना दिली नसल्याचाही आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे हे सरकार धार्जिणे निर्णय घेत असून त्यांच्यातील वाघ सरकारने कधीच मारून टाकला आहे, असेही विधान राज ठाकरे यांनी केले.

हेही वाचा        :            महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी 

राज ठाकरे म्हणाले, काल ५ वाजता प्रचार थांबला. आजपर्यंत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्यानंतरच्या दिवशी मतदान, अशी प्रथा होती. पण या सरकारला जे हवंय? यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे का? याची शंका येते. काल निवडणूक आयोगाने पत्रक काढले की, मतदानाच्या आदल्या दिवशी ५ वाजेपर्यंत तुम्ही मतदारांना भेटू शकता. ही प्रथा कशी आणि कुठून आली? ही प्रथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला का नव्हती, ती आजच का आली? उमेदवार मतदारांना जाऊन भेटू शकतात, पण पत्रके वाटू शकत नाही. म्हणजे उमेदवारांनी पैसे वाटायचे का? मुळात ही मुभा का दिली? असं राज ठाकरे म्हणाले.

तसेच निवडणूक आयोगाने एक नवीन मशीन आणले असून जे ईव्हीएमला जोडले जाणार आहे. या मशीनची कोणत्याही राजकीय पक्षाला माहिती दिलेली नाही. ते मशीन आम्हाला दाखवले गेलेले नाही. उद्धव ठाकरेंच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल पत्र लिहिले आहे. हे मशीन राजकीय पक्षांना का दाखवले गेले नाही, हे मशीन काय आहे? राजकीय पक्षांना याची माहिती द्यावीशीही त्यांना वाटत नाही. निवडणूक आयुक्त वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. अर्थात आताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकला आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button