Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दसरा मेळावा : मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सरकारला ‘‘अल्टिमेटम’’

दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करा : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या!

Share On

Manoj Jarange Demands from Dasara Melava: मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्या मेळाव्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर सरकारने जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक घ्यायची नाही. ही निवडणूक जाहीर केली तर मंत्र्यांना राज्यात सभा घेऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा अन्यथा तुम्हाला सुट्टी नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करा’ : मनाेज जरांगे पाटील

मराठवाड्यात आणि मराठवाड्यालगतच्या भागात दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करा. 70 हजार रुपये हेक्टरी भरपाई द्या. मी जे बोलतो ते करतो,आता सुरु झाली खरी फाईट, दिवाळीच्या आत सरसकट 70 हजार द्या, ज्यांच्या जमिनी,पिकं वाहून गेली त्यांना 1 लाख 30 हजार भरपाई द्या. ज्यांची जनावरं, कांदा, धान्य, पिकं वाहून गेली त्या शेतकऱ्यांना शेतकरी सांगेल तशी नुकसान भरपाई द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘नोकरीवाल्यांचे प्रत्येकाचे पैसे कापा’

शेतकऱ्यांच्या ऊसाचे 15 रुपये कापायचे ठरवले आहे ते कापायचे नाही. याला पर्याय म्हणून ज्याला 10 हजार पगार आहे त्याचे अडीच हजार कापा,1 लाख असणाऱ्यांना 20 हजार, 2 लाख पगार असणाऱ्याचे 50 हजार कापा. जास्त पगार असणाऱ्यांच्या पगारांचा चौथा हिस्सा कापा. नोकरीवाल्यांचे प्रत्येकाचे पैसे कापा असंही ते म्हणाले आहेत.

जेवढे उद्योगपती आहेत.यांच्याकडे हजार कोटींच्या प्रॉपर्टी आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सोनिया गांधी, अंबानी यांचे पैसे कापा. यांच्याकडे कमी प्रॉपर्टी आहे का? यांचे पैसे कापा. राज ठाकरे यांच्याकडे कमी आहे का? नारायण राणे, विखे, मोहिते, निंबाळकर यांना 2 -4 पोते द्या. यांचे पैसे कापून शेतकऱ्यांना मदत करा असंही ते म्हणाले आहेत.

“सगळ्या मोठ्या लोकांकडून एकेक कोटी घेऊन जमा केले तर 1 हजार कोटी वसूल होतील. मुख्यमंत्र्यांनी जमा करून शेतकऱ्यांना द्यावे. बावनकुळे, निजामी गॅझेट म्हणणाऱ्याकडून पैसे वसूल कर. शिंदे साहेबाचे आमदार घेऊन पळणाऱ्याकडून वसुली करा. शाहरुख खान एक नंबरला आहे, त्याच्याकडून घेऊन द्या ना शेतकऱ्यांना,” असंही त्यांनी सांगून टाकलं.

हेही वाचा: महाराष्ट्र–जर्मनी सहकार्यास नवे आयाम मिळतील; उपमुख्यमंत्री अजित पवार

‘शेतीला नोकरीचा दर्जा द्या’

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा अन्यथा तुम्हाला सुट्टी नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या. शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव द्या. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. 10 एकरच्या आतल्या शेतकऱ्यांना शेतीचा दर्जा देऊन 10 हजार रुपये पगार सुरु करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘…तर शेतकऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची तारीख ठरवणार’

पीकविमा सगळा द्या. दिवाळीपर्यंत हे सगळं सरकारने केले नाही, तर शेतकऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची तारीख ठरवणार. सरकारला गॅझेटसाठी एक महिना देत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर सरकारने जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणूक घ्यायची नाही.
ही निवडणूक जाहीर केली तर मंत्र्यांना राज्यात सभा घेऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगेंनी केलेल्या 8 प्रमुख मागण्या

1) दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा
2) शेतकऱ्याला हेक्टरी 70 हजार मदत द्यावी
3) शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार मदत द्या
4) सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी
5) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी द्या
6) शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव द्या
7) सरकारने शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, महिन्याला 10 हजार द्या
8) पीकविम्याला बसवलेले 3 ट्रीगर हटवा, पूर्ण पीकविमा द्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button