Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

उर्फीने भाजपत प्रवेश केला तर ? पत्रकाराच्या प्रश्नावर चित्रा वाघ भडकल्या..

जेवढी हिम्मत आहे, तेवढ्या हिमतीने माझ्या विरोधात बोलावं मी सर्वांना पुरून उरेल
पुणे :
भाजप नेत्या चित्रा वाघ व उर्फी जावेद यांच्यामधील वाद थांबायचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोप अभिनेत्री उर्फी जावेदने केला आहे. यावर चित्रा वाघ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी उर्फी जावेदला मी कुठलीही धमकी दिली नाही, असे स्पष्ट केले आहे.
मी फक्त उर्फीला इशारा दिला आहे की, महाराष्ट्रात नागडी उघडी फिरू नको, असं सांगणं म्हणजे धमकी नाही. आमचा आक्षेप फक्त उर्फीच्या कपड्यावर आहे. इतर गोष्टींवर नाही. त्यामुळे माझा अजूनही तिला इशार आहे की, उर्फी जावेदने कपडे घालून रस्त्यावर फिरावे. मला कोण काय बोलते याचा मला फरक पडत नाही. माझ्यामुळे उर्फीला प्रसिद्धी मिळते म्हणून मी बोलायचं नाही असं होणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
उद्या उर्फी जावेद भाजपमध्येच आली तर? काय कराल. यावर उत्तर देताना चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. असल्या नंगट लोकांसाठी भाजपामध्ये जागा नाही. तुम्हाला काय वाटतं. भाजपामध्ये लोक एका ध्येयासाठी काम करतात. या विषयाचा मजाक बनवू नका. आमच्यावर बोलतात, टीका करतात तेवढं ठिक आहे. पण आमच्या पक्षावर बोलू नका. माझ्या परिवारावर टीका करु नका, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
सोबतच, राज्यामध्ये असं विकृतपणे उघडे नागड फिरणं याबाबत मी आवाज उठवला तर काय चूक केली. कुणात किती हिम्मत आहे, तेवढ्या हिमतीने माझ्या विरोधात बोलावं आणि काम करावं. मी सर्वांना पुरून उरेल असंही चित्रा वाघ यांनी म्हंटलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button