Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोकणात जोरदार पाऊस; रत्नागिरीत जनजीवन विस्कळीत

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पुढील चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून काही नद्या या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, समुद्रालाही उधाण येत असून खाडी आणि समुद्रकिनारच्या नागरिकांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button