Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रायगड-रत्नागिरीला जोडणारा आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून बंद

Share On

अलिबाग – रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सावित्री नदी दुर्घटनेनंतर या पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून आता हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पूल बंद ठेवण्यात येणार आहे.

आंबेत पूल नादुरूस्त झाल्यामुळे यावरची अवजड वाहनांची वाहतूक याआधीच बंद करण्यात आली होती. मात्र आता पूल पूर्णपणे बंद केल्यामुळे दापोली, मंडणगड, वेळास, बाणकोट, आंजर्ले, मुरूड, दाभोळ याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली असून फेरीबोटीतून प्रवाशांना अवजड आणि छोटी वाहने नेता येणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button