राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर: १७ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’, क्रिकेटपटूंना डच्चू!

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून यंदाच्या यादीतून एक मोठी बाब समोर आली आहे. यंदा एकाही खेळाडूची सर्वोच्च अशा ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारा’साठी निवड करण्यात आलेली नाही. तर विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करणाऱ्या १७ खेळाडूंना प्रतिष्ठित ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कार यादीत एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या नावांची शिफारस केली होती.
खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि तिरंदाज ज्योती सुरेखा वेण्णम यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. निवड समितीच्या बैठकीत यावर विचारमंथन झाले तरी अंतिम यादीत कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही.
हेही वाचा
मोशीत साकारणार वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकास केंद्र!
National Sports Awards 2025 Announced 🏆
The Arjuna, Dronacharya, and Rashtriya Khel Protsahan Puraskar 2025 awards are out! 🇮🇳
Full list 👉 https://t.co/rgfAf1tMgX#NationalSportsAwards2025 #KheloIndia
— Dept of Sports, Govt of India (@IndiaSports) August 18, 2026
यंदाचे अर्जुन पुरस्कार विजेते (१७ खेळाडू)
- ॲथलेटिक्स: तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही., प्रियांका गोस्वामी
- बुद्धिबळ: विदित संतोष गुजराथी, दिव्या जितेंद्र देशमुख
- बॅडमिंटन: ट्रीसा जॉली, गायत्री गोपीचंद
- हॉकी: लालरेमसियामी, राजकुमार पाल
- कबड्डी: सुरजीत, पूजा
- नेमबाजी: अखिल श्योराण
- डेफ शूटिंग (बधिर नेमबाजी): धनुष श्रीकांत
- पॅरा-स्पोर्ट्स: रुद्रांश खंडेलवाल (पॅरा-शूटिंग), एकता भयान (पॅरा-ॲथलेटिक्स)
- इतर क्रीडा प्रकार: नरेंद्र (बॉक्सिंग), अरविंद सिंग (रोइंग)





