Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मुंबईत दुपारी चक्रीवादळ धडकणार, मुंबईपासून आता अवघ्या 190 कि.मी. अंतरावर

मुंबई | निसर्ग चक्रीवादळ मुंबईत 3 वाजता दाखल होणार होते. मात्र आता 1 वाजता दाखल होण्याची शक्यता आहे. किनार पट्टीवरील सगळ्याच जिल्ह्यांचे पालकमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणाऱ्या क्षणाक्षणाचे परिस्तिथीचे उपडेत घेत आहेत. महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या उंबरठ्यावर आले आहेत. सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून अवघ्या 130 किमी अंतरावर होते. तर तर मुंबईपासून 175 किमी दूर अंतरावर होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरीत वाऱ्याने चांगलाच वेग पकडलेला आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आज आणि उद्या महाराष्ट्रावर असण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button