ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक

​सुनेत्रा पवार : बालगंधर्व रंगमंदिरात गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव

​पिरंगुट, : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही स्व. अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असून महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. संस्थेला अधिक गति व योग्य दिशा देताना अजितदादांनी जपलेली पारदर्शकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.

​पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. तसेच पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत सभासद पाल्य आणि सभासदांचाही गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात पतसंस्था, सेवक कल्याण आणि ग्राहक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

हेही वाचा – सुपा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर तातडीने कारवाई करा; विखेंचे अधिकाऱ्यांना आदेश

​सुनेत्रा पवार म्हणाल्या, शिक्षणाशिवाय व्यक्तीच्या मूल्यांचा आणि संस्कारांचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून ते व्यक्तिमत्त्वाला आकार देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक यशामागे त्यांची जिद्द, पालकांचा त्याग आणि शिक्षकांची दूरदृष्टी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

​कार्यक्रमात पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला, तर मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता नाणेकर, उपाध्यक्ष डॉ. विलास वाणी, सचिव बंडू दातीर, खजिनदार चंद्रशेखर वाघमारे, सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष डॉ. तुषार शितोळे, सचिव श्रीहरी लवांडे, ग्राहक संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे, सचिव अनिल जाचक उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button