breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहावी बोर्डाची परीक्षा उद्यापासून, परीक्षेच्या एक दिवस आधी ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!

SSC Exam 2024 | दहावी बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. १ मार्चपासून दहावी बोर्ड परीक्षेला सुरवात होणार आहे. १ ते २६ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला तणावमुक्त ठेवतील, तर काही छोट्या चुकांमुळे मोठे नुकसानही होऊ शकते. आज आपण अशा टिप्स जाणून घेऊयात ज्या परीक्षेदरम्यान आणि त्याच्या आदल्या दिवशी उपयोगी पडतील.

परीक्षेच्या एक दिवस आधी ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!

  • परीक्षेच्या एक दिवस आधी तुम्हाला जे काही सामान घेऊन जायचे आहे ते काढून तुमच्या समोर ठेवा आणि बॅग भरून ठेवा. म्हणजेच अर्थातच सकाळी उठल्यानंतर या तयारी करू नका.
  • जर तुमचे परीक्षा केंद्र जास्त अंतरावर असेल तर शक्य असल्यास एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर जा. तिथं कसं जायचं, छोटा मार्ग कोणता आणि कोणाच्या सोबत जायचे आहे, याची सर्व तयारी आधीच करून ठेवावी.
  • नेहमी पेपरला जाताना अतिरिक्त अर्धा तास वेळ जास्त द्या. कारण कोणत्या दिवशी मार्गात काही समस्या उद्भवू शकतात हे माहित नाही.
  • तुमचे प्रवेशपत्र, पेन्सिल बॉक्स, भूमिती बॉक्स, ड्रेस, शूज, पाण्याची बाटली इत्यादी आगाऊ तयार ठेवा.

हेही वाचा      –      १ मार्चपासून बदलणार ‘हे’ नियम! सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार का? 

  • आदल्या रात्री नीट झोपा आणि पुरेशी झोप घ्या. अभ्यास किंवा उजळणी करण्यात अडकू नका.
  • तसेच पेपरच्या एक दिवस आधी रात्री नीट झोपा, हलका आहार घ्या. अन्न घरी बनवलेले असणे महत्वाचे आहे. बाहेरचे किंवा जंक फूड अजिबात खाऊ नका.
  • भरपूर पाणी प्या आणि कॅफिनपासून दूर राहा. जास्त चहा किंवा कॉफी टाळा.
  • आदल्या रात्री जागून अभ्यास करण्याची चूक करू नका.
  • वेळेवर उठा आणि तयारीसाठी पुरेसा वेळ द्या जेणेकरून तुम्हाला घाई होणार नाही.
  • ओव्हरथिंकिंग मोडमधून बाहेर या आणि निरुपयोगी गोष्टींचा विचार करू नका.
  • तुमच्या तयारीबद्दल कोणाशीही बोलू नका आणि कोणाशीही तुलना करू नका.
  • व्यवस्थित खा, पुरेशी झोप घ्या, संगीत ऐका, फिरा आणि कुटुंबासोबत बसून तणावमुक्त राहा.
  • वेळेवर निघा आणि परीक्षेच्या दिवशी वेळेपूर्वी पोहोचा.
  • घरून हलका नाश्ता करून बाहेर पडण्याची खात्री करा.
  • पेपर मिळाल्यावर आधी सर्व प्रश्न नीट वाचून रणनीती बनवून सोडवा.
  • वेळेचे व्यवस्थापन लक्षात ठेवा आणि जेवढे वेळेत तो विभाग पूर्ण करून बाहेर पडा.
  • शेवटी पुनरावृत्तीसाठी १० मिनिटे वाचवा आणि तुम्हाला आढळलेल्या कोणत्याही त्रुटी दूर करा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button