breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देवदर्शनाहून परततना अपघात ; १३ जागीच ठार

बेंगळुरू | कर्नाटक राज्यातील कुनिगल टक येथे दोन भरधाव कार एकमेकींना धडकून झालेल्या भीषण अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

तामिळनाडूतील होसुरू मार्गाने ट्रेवेरा येथील यात्रेला हे भाविक गेले होते. तेथून परतत असताना भाविकांच्या कारला अपघात झाला. या भीषण अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातात भाविकांच्या कारचा चुराडा झाला.

कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील कुनिगल टक येथे भरधाव वेगात असलेली भाविकांची ही कार आली असता समोरून येणाऱ्या कारला वेगात धडकली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक देतात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून ही कार पलिकडून जात असलेल्या कारवर जोराने धडकली.

या अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button