breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मालवाहतूकदार संपाचा लघुउद्योगांना फटका

पिंपरी –  माल वाहतूकदारांच्या संपामुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील लघू उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. या संपामुळे लघुउद्योगांना मिळणारा कच्च्या मालाचा पुरवठा थांबला आहे. केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करून हा संप वेळीच मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली आहे.

संपामुळे अनेक लघुउद्योगातील उत्पादन थांबले आहे. संप असाच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांत मोठ्या कंपन्यांची “ऑर्डर’ लघुउद्योगाकडून पूर्ण होऊ शकणार नाही. परिणामी लघुउद्योगातील कामगारांपुढे बेकारीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. वाहतूकदार संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी माल वाहतूकदारांनी शुक्रवार (ता. 20) पासून देशव्यापी संप पुकारलेला आहे. माल वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा मोठा फटका या उद्योगांना बसला असून, मुंबई तसेच परराज्यातून या उद्योगांना होणारा कच्चा मालाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. उद्योगांकडील सध्याच्या कच्चा माल संपत आल्याने निर्मितीवर परिणाम होत आहे. तयार उत्पादने बाहेर पाठवणेही संपामुळे अशक्‍य झाल्याने उद्योजक हवालदिल झाले आहेत.  लघुउद्योगांना कच्चा मालाचा पुरवठा करणारे काही स्थानिक पुरवठादारही आहेत; परंतु त्यांच्याकडील साठ्याला खूप मर्यादा आहेत. काही विशिष्ट प्रकारचे सुटे भाग शहरात मिळत नसल्याने उद्योग अडचणीत आले आहेत.

“”मोठ्या कंपन्यांना उघुउद्योगांकडून होणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा थांबल्याने मोठ्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. शहरात ऑटो कंपन्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची (लोखंड, स्टिल) जास्त आवक होते. कच्चा मालाची टंचाई निर्माण झाल्याने काही विक्रेते चढ्या भावाने विक्री करू लागले आहेत. कामगारांना देण्यात येणाऱ्या “ओव्हरटाइम’च्या कालावधीत पाच ते सहा तासांवरून एक ते दीड तासावर आला आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button