breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई; 10.20 कोटींची संपत्ती जप्त

मुरूड, दापोली, रत्नागिरीमधील अंदाजे 52 गुंठे जमीन जप्त
मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं साई रिसॉर्ट मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर होतं. त्याचा तपासही ईडीकडून करण्यात आला होता. याच रिसॉर्टवर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्टसह अनिल परबांची 10.20 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. याबाबतची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. अनिल परब यांचा दापोलीतील साई रिसॉर्टसह 10.20 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. आता काही दिवसांनी अनिल परबांनाही अटक होईल. अभी अनिल परब का हिसाब पुरा किया जाएगा, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
अनिल परबांची 10.20 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुरूड, दापोली, रत्नागिरीतील गट क्रमांक 446 मधील अंदाजे 52 गुंठे जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे. साई रिसॉर्ट उभारण्यात आलेली जमीन ज्याची किंमत 7,46,47,000 रुपये इतकी आहे.
याआधी ८ मार्चला आयकर विभागाने मुंबईतल्या एका केबल ऑपरेटवरवर तसंच वाहतूक विभागातील एक कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर शोध मोहीम राबवली होती. मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरी अशा २६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना दापोली येथील जमीनाचा काही भाग २०१७ मध्ये अनिल परब यांनी १ कोटी रूपयांना खरेदी केल्याचं आढळून आलं. या मालमत्तेची नोंदणी २०१९ मध्ये झाली होती असंही समोर आलं. सदर जमीन नंतर 2020 मध्ये शोध कारवाईमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाला 1.10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली गेली.
सदरची जमीन तीच आहे ज्यावर २०१७ ते २०२० या कालावधीत रिसॉर्ट बांधण्यात आलं. अनिल परब यांच्याववर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टच्या बांधकामाचा मोठा भाग बांधून पूर्ण झाला होता. नंतर २०२० मध्ये जेव्हा ही प्रॉपर्टी विकण्यात आली तेव्हा रिसॉर्टचं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळे हे रिसॉर्टच अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईचं मूळ ठरलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button