breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर उद्या (28 जुलै) जाहीर

12 वीच्या निकालानंतर आतुरता होती ती 10वीच्या निकालाची. हीच आतूरता आता संपली असून अखेर राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या म्हणजे २८ जुलैला दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडली होती.

मार्च २०२० मध्ये एकूण ९ बोर्डात दहावीची परीक्षा झाली होती.www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ३० जुलैपासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button