breaking-newsआंतरराष्टीय

५,८०० गायींना घेऊन जाणारे जहाज दक्षिण जपानच्या समुद्रात बुडाले

टोकियो – दक्षिण जपानमध्ये ५,८०० गायी घेऊन जाणारे एक जहाज समुद्रात बुडाल्याने खळबळ उडाली आहे. या जहाजावर ४३ कर्मचारी होते. खराब हवामानामुळे हे जहाज भरकटले होते. खराब हवामानात अडकल्याचा संदेश बेपत्ता होण्यापूर्वी या जहाजाने पाठवला होता. त्यानंतर तटरक्षक दलाने बचाव मोहिम सुरू केली. जहाजावरच्या एका सदस्याला वाचविण्यात यश आले आहे.

वाचलेला कर्मचारी हा फिलिपिन्समधला होता. जपानच्या तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला हा कर्मचारी समुद्राच्या पाण्यात आढळला. तो थकलेला आहे. मात्र त्याची प्रकृती चंगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सुमारे ११,९४७ टन वजनाचे हे जहाज पूर्व चीन समुद्रातील अमामी ओशिमा किनाऱ्यावरून ५,८०० गायी घेऊन निघाले होते.

समुद्रात कशा प्रकारचे वादळ होते आणि हे जहाज नेमके कसे अडकले याची विस्तृत माहिती अजून मिळू शकली नाही. जहाजातील कर्मचाऱ्यांमध्ये ३८ फिलिपिन्स, २ न्यूझीलंड आणि १ ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. उर्वरित क्रू सदस्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. यात ५ विमाने आणि प्रशिक्षित पाणबुड्यांचादेखील समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button