breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमेरिकेची कॅलिडोस्कोप ही कंपनी भारताच्या इन्फोसिसने विकत घेतली

नवी दिल्ली – माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी भारतीय कंपनी अशी ओळख असलेल्या इन्फोसिसने अमेरिकेतील कॅलिडोस्कोप इनोवेशन ही कंपनी सुमारे ३०८ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. डिझाईन आणि विकास कंपनी अशी कॅलिडोस्कोपची ओळख आहे. ही कंपनी विकत घेतली असल्याचे इन्फोसिसने शेअर मार्केटला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी लागणारी उपकरणे डिझाईन करण्याचे काम कॅलिडोस्कोप ही कंपनी करते. याशिवाय ग्राहक आणि कंपन्यांना गरजेनुसार हवे असलेले डिझाईन आणि संशोधन करण्याचे काम ही कंपनी करते. ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी सक्षम उपकरणांची डिझाईन करण्याचे काम कॅलिडोस्कोप करत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात ती प्रसिद्ध आहे. शल्य चिकित्सेसाठी लागणारी उपकरणे ही कंपनी डिझाइन करते. मात्र इन्फोसिसने ही कंपनी विकत घेतल्यामुळे संशोधन, डिझाईन आणि आरोग्य क्षेत्रात इन्फोसिसचा वाटा वाढणार आहे. २०२०-२१च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत या दोन्ही कंपन्यांमधील खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर या कंपनीची मालकी इन्फोसिसकडे येईल. या व्यवहारामुळे इन्फोसिसचा सॉफ्टवेअर डिझाईन आणि चिकित्सा उपकरण डिझाईन विभाग अधिक मजबूत होईल, असे इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button