breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

४३ अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातल्यानंतर चीन खवळला, प्रवक्ते म्हणाले…

नवी दिल्ली – चीनकडून सतत भारतविरोधी कारवाया होत असल्याने भारताकडूनही चीनवर डिजिटल स्ट्राईक करण्यात येत आहे. चीनची अर्थव्यवस्था कोस‌ळवण्यासाठी चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याचं आवाहन केंद्र सरकारने केलंय. तसेच, केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक चिनी मोबाईल अॅप्सवही भारतात बंदी घातली आहे. त्यातच, मंगळवारीही केंद्र सरकारने ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी घातल्याची नव्याने घोषणा केली. . मंगळवारी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ४३ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र, या बंदीमुळे चीन खवळला आहे. या बंदीचा निषेध करताना चिनी प्रवक्त्या जी रोंग म्हणाले की, “अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. आशा आहे की भारत बाजारपेठेत सर्वांना निष्पक्ष, निःपक्षपातीपणे व्यवसाय करु देईल आणि भेदभाव करणार नाही”.

जी रोंग यांनी यावेळी भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला आहे. “चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांसाठी विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत,” असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

भारताने स्पष्ट केली भूमिका

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे. २९ जुलै रोजी सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर २ सप्टेंबरला ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप, लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६९ ए अन्वये बंदी घालण्यात आली.

सरकारने म्हटलं आहे की, “नागरिकांचं हित व देशाचे सार्वभौमत्व लक्षात घेऊन या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे”.

बंदी घालण्यात आलेली अ‍ॅप्सवर पुढीलप्रमाणे, अली सप्लायर्स मोबाइल अ‍ॅप, अलीबाबा वर्कबेंच. अलीएक्स्प्रेस स्मार्टर शॉपिंग, बेटर लिव्हिंग, अलीपे कॅशीयर, लालामुव्ह इंडिया डिलीव्हरी अ‍ॅप, ड्राइव्ह विथ लालामुव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड- बिझीनेस कार्ड रिडर, कॅमकार्ड बीसीआर (वेस्टर्न), सोल- फॉलो दी सोल टु फाइंड यू, चायनीज सोशल डेटिंग अ‍ॅप, वुईडेट, सिंगॉल डेटिंग अ‍ॅप, अ‍ॅडोर अ‍ॅप, ट्रली चायनीज, ट्रली आशियन, चायना लव्ह, डेट माय एज, आशियन डेट, फ्लर्टविश, गाइज ओन्ली डेटिंग, टय़ुबिट, वुई वर्क चायना, फर्स्ट लव्ह लाइव्ह, रेला, कॅशियर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजी टीव्ही. वुई टीव्ही,वुई टीव्ही सीड्रामा, व्हीटीव्ही लाइट, लकी लाइव्ह, टाओबाओ लाइव्ह, डिंग टॉक, आयडेंटिटी व्ही, आयसोलँड २, बॉक्स स्टार, हिरोज इव्हाल्व्हड, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, म्युककिन वॉच. कॉन्क्विस्टा ऑनलाइन २ यांचा समावेश आहे.

आताच्या निर्णयाने चीनच्या अलीबाबा या कंपनीला फटका बसणार आहे. भारताने गेल्या काही महिन्यात एकूण २२० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button