breaking-news

३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ; सतेज पाटील

कोल्हापूर | महाईन्यूज

सत्तेवर येताच शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील ५७ हजार १९६ शेतकऱ्यांना ३९१ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे दिलेली आहे.

छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनी मुख्य शासकिय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर वकील सूरमंजिरी लाटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पूरपरिस्थितीत कोल्हापूरकरांनी जो संयम आणि धैर्य दाखविले त्यांच्या वृत्तीला मी सलाम करत असल्याचे सांगितले.  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ मिळणार आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी  लवकरच नवीन योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे.

पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, पुरुष गृह रक्षक पथक, महिला गृह रक्षक पथक, वन रक्षक दल, एनसीसी मुलांचे पथक, एनसीसी मुलींचे पथक, अग्निशामक पथक, स्काऊट बॉईज पथक, मुलींचे स्काऊट गाईड पथक, आरएसपी मुलांचे पथक, आरएसपी मुलींचे पथक, एअर स्कॉड्रन एनसीसी पथक, फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सीक लॅब व फिंगर प्रिंट ब्युरो व्हॅन पथक, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, दहशदवाद विरोधी पथक, दंगल नियंत्रण पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथ, शिक्षण विभागाचा चित्ररथ, अग्निशामन वाहन, १०८ रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी चित्ररथ, तंटामुक्त अभियान चित्ररथ जवानांच्या शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली आहे. 

यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांना गुलाब पुष्प देवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मान्यवर आणि विद्यार्थी, विद्यार्थींनीचीही भेट घेवून त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी- माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button