breaking-newsक्रिडा

विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमध्ये आता ‘या’ बाबतीत हिटमॅनला टाकलं मागे

ऑकलंड | टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आतापर्यंत 80 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळत 2745 रन्स बनवले आहेत तर हिटमॅन रोहित शर्माने 106 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 2648 रन्स बनवले आहेत. विराट कोहली याने रोहित शर्माला रन्ससोबतच आता आणखी एका बाबतीत मागे टाकलं आहे.

आतापर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात रन्समध्ये स्पर्धा सुरु होती ज्यामध्ये कॅप्टन विराट कोहलीने बाजी मारली. त्यानंतर आता रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये विराट कोहलीने आणखी एक कारनामा केला आहे. या मॅचमध्ये विराट कोहली याने न्यूझीलंडच्या दोन बॅट्समनच्या कॅच घेतल्या आणि रोहित शर्माला मागे टाकलं. राट कोहली याने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये सर्वाधिक कॅचेस घेणाऱ्या भारतीय प्लेअर्समधील दुसऱ्या क्रमांक गाठला आहे. विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 41 कॅच घेतल्या आहेत. याबाबतीत विराट कोहलीने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 कॅचेस घेतल्या आहेत.

टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे भारतीय प्लेअर्स
सुरेश रैना – 42 कॅचेस
विराट कोहली – 41 कॅचेस
रोहित शर्मा – 39 कॅचेस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button