breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्याशाळेत अधिका-यांनी केले मार्गदर्शन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे नुकतीच कार्यशाळा घेतली. घनकच-यावर प्रक्रिया करणा-या वेगवेगळया प्रकारच्या यंत्रणा, पध्दती, त्याबाबतची माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती प्रभारी अतिरिक्त आयुक्त किरण गावडे यांनी दिली.

कार्यशाळेस आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदिप खोत, अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, सहा आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील, किरण पंडीत तसेच सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे  यांनी “घनकचरा व्यवस्थापन नियम,  २०१६ अंतर्गत प्रत्येक कचरा निर्मात्याने (नागरिकांनी) विघटनशील (कुजणारा किंवा ओला), अविघटनशील (न कुजणारा किंवा सुका) व घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे देवून स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे/एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे.  ओला कचरा – हिरव्या, सुका कचरा – निळया व घरगुती घातक कचरा – लाल रंगाच्या बकेट मध्ये ठेवण्यात यावा.  तसेच मोठया प्रमाणात कचरा निर्माण (Bulk Waste Generator) (दर दिवशी १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक) करणा-यांनी अथवा संघटीत संस्था आणि समुदाय ज्यांचे क्षेत्र ५,००० चौ. मी. हून अधिक आहे, त्यांनी कचरा निर्मीतीच्या ठिकाणी वर्गीकरण करुन ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्चित केलेली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लॅस्टीक कचरा  व घनकचरा व्यवस्थापन बाबत जाहीर नोटीसद्वारे सूचना प्रसिध्द केल्या आहेत. तरी नागरिकांनी याचे पालन करावे.” असे आवाहन त्यांनी केले.

प्रभाकर तावरे यांनी घरगुती सोप्या कच-यापासुन खत निर्मितीची पाईप पध्दत, कुंडया- मडके पध्दत, बगीच्यामधील पालापाचोळा न जाळता साठवुन खतनिर्मिती करण्याच्या पध्दती  सांगीतल्या.  यावेळी संजीवनी बॅग्जचे  प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच, वायु मित्र संस्थेचे सागर माने यांनी खतनिर्मितीपासुन तयार होणा-या घरगुती गॅसचे प्रात्यक्षिक दाखविले. याबाबत अधिक व्यापक प्रमाणात नागरिकांना माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी सीआयआय (Confederation of Indian Industry) मार्फत दिनांक ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर रोजी ऑटो क्लस्टर, प्रदर्शन केंद्र, ‍चिंचवड येथे पर्यावरण संरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ उर्जा, ई मोबिलीटी याबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

अण्णा बोदडे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button