breaking-newsताज्या घडामोडी

कणकवली बाजारपेठेत आग; दोन दुकाने जळून खाक

सिंधुदुर्ग – कणकवलीच्या पटवर्धन चौकातील बाणे ब्रदर्स यांच्या तंबाखू आणि किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. आगीची झळ बाजूच्या डी कलेक्शन या कापड दुकानाला बसली. या आगीत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती नगरपंचायतीला दिली. मात्र नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबात पाणीच नसल्याने आग विझविण्यात विलंब झाला. नागरिकांनी जवळच्या हॉटेल डायमंडमधील नळाच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भीषण असल्याने आटोक्यात आली नाही. खबरदारी म्हणून डी कलेक्शन दुकानातील कपडे नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर उशिरा नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझविण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button