breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत जाती-पातीचे राजकारण? शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना ‘घरचा आहेर’!

शहर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर : ‘महाईन्यूज’च्या  वृत्तांवर अखेर शिक्कामोर्तब

पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाती-पातीचे राजकारणाला खतपाणी घातले जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या पुढाकाराने अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदार संघात पक्षाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह अनुसूचित आघाडीच्या अध्यक्षांचा डावलले जात आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे, अशी जाहीर नाराजी पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गटातटाचे राजकारण…’’ अशा आशयाच्या मथळ्यांखाली ‘महाईन्यूज’ने वारंवार पक्षश्रेष्ठी आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर पुन्हा एकदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता २०१९ मध्ये स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी शहरातील संघटनात्मक खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. सुरवातील शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह दुसऱ्या फळीतील तीन-चार नवे चेहरे प्रचंड इच्छुक होते. मात्र, शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय साठेमारी झाली. त्यात अजित गव्हाणे यांना यश मिळाले. परंतु, नंतरच्या काळात राष्ट्रवादीत गटातटाचे राजकारण उफाळून आले.

माजी आमदार विलास लांडे गट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे गट, माजी महापौर आझमभाई पानसरे गट, माजी महापौर योगेश बहल गट असे गट आपआपल्या परीने कार्यरत आहेत. त्याचा अप्रत्यक्ष फटका पक्षाच्या एकूण कार्यक्षमतेवर होताना दिसत आहे.

वास्तविक, शहरातील एकमेव आमदार असलेल्या अण्णा बनसोडे यांचा अनुभव पाहता त्यांना आणि त्यांच्यासह माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर आझमभाई पानसरे, माजी महापौर मंगला कदम यांना पक्षाच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे दिसत नाही. आतापर्यंत सुरू असलेली घुसमट अखेर बाहेर पडली.

मध्यंतरी, युवक आघाडीच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘महाईन्यूज’नेच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर युवक आघाडीचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी संबंधित पदाधिकारी अकार्यक्षम होते. त्यांच्यावर कारवाई करणार होतो. त्याची कुणकुण संबंधितांना लागली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा बनाव केला, असा दावा केला होता. आता सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी लिहिलेल्या जाहीर पत्रामुळे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल यांची ‘फेसबूक पोस्ट’ काही समझोत्यानंतर ‘डिलिट’ करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत औसरमल यांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

‘लेटरबॉम्ब’मुळे  राष्ट्रवादीत खळबळ…

पिंपरी मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची नाराजी… याबाबतही ‘महाईन्यूज’ ने वारंवार प्रकाश टाकला आहे. मात्र, एका कार्यक्रमा बनसोडे आणि लांडे यांना एकत्रित करण्यात यशस्वी ठरलेल्या शहर पदाधिकाऱ्यांचे अपयश पुन्हा एकदा समोर आले. आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय पदाधिकाऱ्यांनाही शहर पातळीवर डावलले जात असल्याचा लेटरबॉम्ब पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी बुधवारी (ता. २६ ऑक्टोबर) जाहीरपणे फोडला. नुकतेच  झालेल्या शहर राष्ट्रवादीच्या मासिक बैठकीनंतर औसरमल यांची ही खदखद बाहेर पडली. त्यांनी ती फेसबुकवर व्यक्त केली. त्याव्दारे त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना खुले पत्र लिहित काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार बनसोडे यांच्या मतदारसंघात झालेल्या पक्षाच्या मासिक बैठकीत त्यांनाच डावलण्यात आले. त्यांचा फोटोही बैठकीच्या बॅनरवर नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अजित गव्हाणे जाती-पातीचे राजकारण करताहेत काय?

पिंपरी मतदार संघात झालेल्या मासिक सभेत सर्व सेलध्याक्ष या बैठकीला स्टेजवर होते. अपवाद फक्त अनुसूचित जमाती सेल अध्यक्षांचा होता. त्यांचा नामोल्लेखही केला गेला नाही, या कडे त्यांनी लक्ष वेधले. आमदार बनसोडेंना पक्षात सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते. या सर्व बाबी पक्ष विचारसरणीच्या विरोधात आहेत, त्यामुळे पक्ष जाणूनबुजून जातीवाद, तर करत नाही ना, अशी चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे. ती आपल्यापर्यंत पोचवणे क्रमप्राप्त वाटले; म्हणून हे पत्र लिहण्याचे धाडस केले. आपण पक्षाची प्रतिमा जातीवादी, सरंजामी होऊ देणार नाही, अशी अपेक्षा आहे, असेही औसरमल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

‘महाईन्यूज’ ने वारंवार केलेल्या वृत्तांची काही कात्रणे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button