breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी बोलताना महिलांचा सन्मान राखावा – राज्यमंत्री आदिती तटकरे

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अप्रत्यक्ष समाचार घेतला आहे. आदिती तटकरे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे बोलत होत्या. सध्या सर्वसामान्यांमध्ये इंदुरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे. आपण सर्वजण त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्ती असताना बोलताना तारतम्य बाळगायला हवं आहे.

आपले मत सामाजिक किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असताना निश्चितपणाने महिलांचा, समाजातील व्यक्तींचा सन्मान राखणं महत्वाचं आहे. व्यासपीठावर आपण एकटे म्हणून मत मांडत नसतो. आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे या गोष्टींची दक्षता एक सुजान व्यक्ती म्हणून बाळगायला हवी, असं मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button