breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘बिग बॉस १३’ चा विजेता ठरला सिध्दार्थ शुक्ला…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ च्या विजेतेपदावर सिध्दार्थ शुक्लाने नाव कोरले. शनिवारी झालेल्या फिनालेमध्ये सर्वांना मागे टाकत सिध्दार्थने बाजी मारली. तर आसिम रियाज फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस’च्या १३चा विजेता सिध्दार्थ शुक्लाच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बिग बॉस १३ वे पर्व अनेक मार्गांनी खास ठरले आहे.  या वेळेचे पर्व मागील पर्वापेक्षा खूप वेळ चालले. १४० दिवस बिग बॉसचे १३ वे पर्व चालले.  स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्याची स्पर्धा पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळाली. प्रत्येकाने आपापल्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. अखेर सिद्धार्थ शुक्लानेच ट्रॉफी जिंकत बिग बॉस १३ व्या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

बिग बॉसच्या १३ व्या पर्वात सिद्धार्थ शुक्लाने असीम रियाझचा पराभव केला. या पर्वात काश्मीर मॉडेल असीम रियाज दुसर्‍या क्रमांकावर होता. सिध्दार्थ शुक्ला, असीम रियाझ, रश्मी देसाई, शहनाज गिल, पारस छाब्रा आणि आरती सिंग या सहा स्पर्धकांनी ‘बिग बॉस १३’च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. हा शो बर्‍याच आठवड्यांपर्यंत टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button