breaking-newsमनोरंजन

हृतिक-टायगरच्या ‘वॉर’वर सुझानने दिली ही प्रतिक्रिया

अॅक्शन आणि साहस दृश्यांनी परिपूर्ण असलेला वॉर हा चित्रपट शुक्रवारी (२ ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची सुझान खानची प्रतिक्रिया आली आहे. सुझानने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं असून हा चित्रपट तिला आवडल्याचं दिसून येत आहे.

‘वॉर’ने आतापर्यंत ५५ कोटी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट प्रेक्षकांसह चित्रपट समीक्षकांच्याही पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ‘..आणि उद्या हे दोन हॅण्डसम हंक वर्ल्ड सिनेमा प्लॅटफॉर्मवर खऱ्या अॅक्शन हिरोचा अर्थ सांगतील. हृतिक रोशन, सिद्धार्थ आनंद,टायगर श्रॉफ तुम्ही तिघे भारी आहात’, असं कॅप्शन सुझानने शेअर केलेल्या व्हिडीओला दिलं आहे. सुझानप्रमाणेच दिशा पटानीनेदेखील या चित्रपटाविषयी तिचं मत व्यक्त केलं होतं.

दरम्यान, हृतिक आणि सुझान या दोघांचा घटस्फोट झाला आहे. मात्र अद्यापही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. काही दिवसांपूर्वीच हृतिक आणि सुझान त्यांच्या मुलांसोबत ट्रीपला गेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button