ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

हिवाळी अधिवेशनात अजित पवार , धनंजय मुंडे,आदित्य ठाकरे यांचा ‘हटके लुक’

नागपूर | महाईन्यूज|

ऐरवी पांढ-या झब्बा किंवा कुडता या राजकीय पेहरावातच नेहमी सर्व नेते किंवा राजकारणातले मंडळी दिसतात..सभा असो की पत्रकार परिषद सर्वांचा पेहराव नेहमीचाच…मात्र यंदाच्या 2019 च्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मात्र या राजकिय पेहरावाला बगल देत अनेकजन जरा हटके लुकमध्ये पहायला मिळाले.

जसं की एरव्ही पांढरा कुर्ता आणि पायजम्यात दिसणारे राजकीय नेते हिवाळी अजित पवार अधिवेशनात मात्र वेगळ्याच रुपात दिसले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुटाबुटात आलेले अजित पवार दुस-या दिवशीही जोधपुरी पेहरावात ‘झकास’ लूकमध्ये दिसले.

तर नेहमी पांढऱ्या कुर्ता आणि पायजम्याला पसंती देणारे धनंजय मुंडे यांनी जॅकेटला पसंती देऊऩ एक वेगळ्या आणि ‘कुल’ लुकमध्ये दिसले.

पहिल्यांदाच विधानसभेत निवडून गेलेले आदित्य ठाकरेही फॉर्मल्स कपड्यांवर घातलेल्या स्लीव्हलेस स्वेटरमध्ये अगदी उठून दिसत होते.

हम भी किसी से कम है क्या असचं वाटलं पाहुन जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सुटाबुटात विधानसभवनात आले, एवढच नाही तर त्यावर मफरल घेतल्याने त्यांचा लूक अधिकच खुलून आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button