breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव

मुंबई | महाईन्यूज

पंजाब-नॅशनल बँक गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदीच्या जप्त केलेल्या ११२ वस्तूंचा लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्चला होणार आहे. अमृता शेरगील, एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती या लिलावातील प्रमुख आकर्षण असेल. आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळांसह (लिमिटेड एडिशन) आणि रोल्स रॉईस मोटारीचाही लिलाव करण्यात येणार आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) मोदीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’च्या वतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल, तर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button