breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

हिमायतनगर शहरातील,काही वार्डात सौर उर्जेच्या दिव्यानी केला लखलखाट

  • चोऱ्याना आळा घालण्यासाठी मुख्य चौकात सी.सी.टिवी बसविण्याची जनतेची मागणी
  • नगराध्यक्ष यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण

हिमायतनगर | शहरातील नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी हिमायतनगर हे मॉडर्न शहर बनविण्याचा संकल्प केला असुन शहरातील परमेश्वर गल्ली,मंदिर परिसर,स्टेशन रोड,उमर चौक,चौपाटी परिसरात सौर ऊर्जेचे हजारो दिवे व पोल बसवण्याचे आधुनिक काम नगर पंचायतने हाती घेतले आहे, त्यात बरोबर शहरात होत असलेल्या चोऱ्याना आळा घालण्यासाठी शहरातील मुख्य चौकात सी.सी.टिवी बसविण्याची मागणी सुद्धा जनतेतून यावेळी केली आहे.

शहरात लाखो रूपये खर्च करुण दिवे लावण्याच्या प्रत्यक्ष कामाला नगर पंचायतने सुरवात केलि आहे सदया पावसाळ्याचे दिवस असुन पारंपारिक विज केव्हाही गुल होत आहे त्यामुळे शहरातील रेल्वे स्टेशन वस्तितिल नगरसेविका प्र.सदाशिव सातव यांनी वार्डातिल वस्तिमध्ये अंधार पडू नये म्हणुन सूर्याच्या प्रकाशावर तयार होणाऱ्या सौर ऊर्जेचे दिवे लावण्याचे काम प्रगति पथावर करुण घेतले यामुळे नगर पंचायतिला लाईट बिल ही येणार नाही बिनखर्चिक असे आधुनिक तंत्रद्न्यानाने सुसज्य असलेले हे सौर ऊर्जा दिवे पोल हिमायतनगर शहरातील वार्ड क्र 12 चे नगरसेवक रामभाऊ ठाकरे यांच्या वार्डात लावण्याचे काम सदया सुरु आहे त्यामुळे लाईट असो की नसो सौर ऊर्जेचे दिवे संध्याकाळ झाली की चालु होणार व ते पहाट दिवस निघताच बंद होणार असे ऑटोम्याटिक असलेले सौरऊर्जा चे दिवे व पोल हिमायतनगर नगर पंचायतचे नगराध्यक्ष कुणाल राठोड व उपनगराध्यक्ष मो जावेद भाई यांच्या संकल्पनेतुन शहरातील इतर नगरसेवक /नगरसेविका यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी समन्वय साधुन हे आधुनिक् सौर ऊर्जेचे दिवे व पोल लावण्याचे काम शहरात सुरु आहे त्यामुळे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना आज पदावर बसून 2 वर्ष पूर्ण झाले आहेत या दोन वर्षात त्यांनी शहराच्या विकासासाठी लाखो रुपयांचे कामे केलि आहेत त्यामुळे शहरातील जनता खुप समाधानी असल्याचे पाहन्यास येते व यांच्या कामाची सर्व स्थरातुन प्रशंशा होताना सुद्धा दिसत आहे.

त्याच बरोबर येणाऱ्या दिवसात आता शहरातील मुख्य चौकात सी.सी.टीवी कैमेरे सुद्धा बसविन्यात यावे जेने करुण शहरात होणाऱ्या चोऱ्या मागील मुख्य आरोपी मीळन्यास पोलिस प्रशासनास मदत होईल व सर्व शहर सुरक्षित राहील अशी मागणी शहरातील नागरिकांन कडून होत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button