breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मध्य रेल्वेकडून CheckIn Master नावाचे एप लॉन्च; एपच्या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटांची होणार तपासणी

मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचं पहायाला मिळत आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालाल्याचं दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न ही करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु रेल्वे स्थानकात प्रवशांची वाढती गर्दी पाहता खबरदारी घेतली जात आहे. याच कारणास्तव आता मध्य रेल्वेकडून CheckIn Master नावाचे एप लॉन्च करण्यात आला आहे. या एपच्या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यासाठी चेकइन मास्टर एप वापरले जाणार आहे. तिकिट चेकिंग मास्टर या एपच्या माध्यमातून तिकिटांची तपासणी करणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेने हा एप लॉन्च केला आहे. तसेच रेल्वे स्थानाकात नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी गोल आखून दिले असून त्या नुसार उभे राहण्याच्या सुचना केल्या आहेत

तर कालच्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार मुंबईत 1257 रुग्ण आढळून आले असून 55 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,05,829 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधांमधील अन्य कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button