breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘रिंगरोड’वर राबविणार निओ मेट्रो प्रकल्प, तब्बल 1200 कोटी रुपये खर्च

पिंपरी महाईन्यूज प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) मार्ग प्रस्तावित करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवडमधील एचसीएमटीआर म्हणजेच रिंगरोडवर एलिव्हेटेड इलेक्‍ट्रीक निओ मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महामेट्रोने या प्रकल्पासाठी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च गृहीत धरला आहे. लवकरच अंतिम डीपीआरचे सादरीकरण महापालिका पदाधिकारी, गटनेत्यांसमोर केले जाणार आहे.

शहरातील कासारवाडी, नेहरूनगर, भोसरी एमआयडीसी, स्पाइन रस्ता, भक्‍ती-शक्‍ती चौक, रावेत, वाल्हेकरवाडी, काळेवाडी फाटा, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि कासारवाडी असा नियोजित 30 किमी लांबीचा व 30 मीटर रुंदीचा हा वर्तुळाकार मार्ग प्राधिकरण व महापालिका हद्दीतीतून जातो. सद्यस्थितीत महापालिकेच्या ताब्यात 16.35 किलोमीटर रस्ता ताब्यात आहे. उर्वरित ठिकाणी रिंगरोड विकसित करण्यासाठी बाधित नागरिकांचा विरोध आहे. या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो, ट्राम, बीआरटी, लाईट रेल की मोनोरेल यापैकी कोणता पर्याय राबवायचा, हे ठरविण्यासाठी महामेट्रोला डीपीआर बनविण्यास सांगितले होते.

महामेट्रोने डीपीआरमध्ये या मार्गावर इलेक्‍ट्रीक निओ मेट्रो हा पर्याय सुचविला आहे. त्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचा अंतिम डीपीआर तयार झाला असून लवकरच महामेट्रोकडून त्याचे महापालिकेला सादरीकरण करण्यात येणार आहे. तीन डब्ब्याच्या या मेट्रोतून 120 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच याच मार्गिकेवर मिनी रेल करण्याचे प्रयोजन महापालिकेचे आहे. प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाचा डीपीआर करताना महामेट्रोने या मार्गाचे सर्वेक्षण केले. तसेच, डीपीआर करताना त्यांनी काही ठिकाणी रिंगरोडच्या मार्गात बदल करणे शक्‍य असून तसे बदल सुचविले आहेत. त्यामुळे रिंगरोडमुळे बाधित होणारी काही घरे देखील वाचणार आहेत. महामेट्रोने या प्रकल्पासाठी प्रति किमी 40 कोटी म्हणजेच सुमारे 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी ‘एचसीएमटीआर’ योजना प्रस्तावित आहे. पुण्यामध्ये ही योजना शहरातील सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘मेट्रो निओ’च्या माध्यमातून सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठीच मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा मार्ग दोन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. आकुर्डी ते नेहरू नगर हा १२ किलोमीटरचा मार्ग आणि नेहरूनगर ते दापोडी हा १२ किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये चिखली, निगडी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, वैदुवस्ती, कासारवाडी हा परिसर व्यापला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेबरोबरच ‘मेट्रो निओ’च्या माध्यमातून प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे.

मेट्रो निओ आहे तरी काय?

– २५ मीटर लांबी आणि २.९ मीटर रुंदीची बस

– मेट्रोच्या तुलनेत अरुंद.

– २५० प्रवासी क्षमता

– रबरी टायर असलेली ई-बस.

– बसला इलेक्ट्रिक पुरवठा ओव्हरहेड वायरद्वारे होणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button