breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; स्वत: दिलं स्पष्टीकरण, म्हणाला..

Sachin Tendulkar | अभिनेत्री रश्मिका मंदानापासून अनेक बॉलिवुड अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याव्हिडीओमध्ये एका अ‍ॅनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या प्रमोशनबाबतची वाक्य सचिन तेंडुलकर स्वत: म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

व्हिडीओमध्ये नमकं काय?

माझी मुलगी यावेळी एविएटर ही गेम खेळतेय, ज्याविषयी प्रत्येकजण सध्या बोलतोय. वो स्कायवर्ड एविएटर क्वेस्ट अ‍ॅप खेळून दररोज एक लाख ८० हजार रुपये कमावते. मला कधीकधी आश्चर्य वाटतं की हल्ली चांगला पैसा कमावणं किती सोपं झालं आहे. सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे अ‍ॅप अगदी मोफत आहे. कुणीही आयफोनधारक ते डाऊनलोड करू शकतो, अशी वाक्य व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरच्या तोंडी टाकण्यात आली आहेत.

हेही वाचा   –    ‘पैसे कसे ढापायचे हे शरद पवार..’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

सचिन तेंडुलकरनं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. हा व्हिडीओ बनावट आहे. तुम्हाला फसवण्यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे गैरवापर अत्यंत चुकीचा आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की असे व्हिडीओ, अ‍ॅप किंवा जाहिराती तुम्हाला कुठे दिसल्या, तर त्याविरोधात तातडीने तक्रार दाखल करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सलाही यासंदर्भात सतर्क राहणं आवश्यक आहे. अशा प्रकारांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींवर या साईट्सकडून तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे. या प्रकारांबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जेणेकरून अफवांना आवर घालता येईल आणि डीपफेकसारख्या प्रकारांचा गैरवापर संपवून टाकता येईल, असं सचिननं म्हटलं आहे. तसेच, अशा व्हिडीओंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यानं लोकांना केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button