breaking-newsआंतरराष्टीय

व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत मोठी सुधारणा

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. भारताच्या क्रमवारीत तब्बल २३ स्थानांची सुधारणा झाली आहे. भारत आधी व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत १०० व्या स्थानी होता. आता भारत ७७ व्या स्थानी पोहोचला आहे.

View image on Twitter

ANI

@ANI

With all uniform construction bye-laws, from 184 in 2014 ranking we have jumped up by 129 points to 52. This is the largest single jump. It was a big corruption issue. But there has been a record improvement in ranking: Finance Minister Arun Jaitley

या यादीत एकूण १९० देश असून वर्ल्ड बँकेने आज क्रमवारी जाहीर केली. ब्रिक्स देशांच्या यादीत भारताच्या बरोबरीने चीनच्या क्रमावारीतही मोठी सुधारणा झाली आहे. मागच्यावर्षी चीन ७८ व्या स्थानी होता. आता ४६ व्या स्थानी पोहोचला आहे. मागच्या दोन वर्षात भारताच्या क्रमवारीतल ५३ स्थानांची सुधारणा झाली असून नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे.

ANI

@ANI

When we came to power the PM had said that we have to come within the top 50 ranks. Today, we are at Rank 77. DIPP has worked on how to up the ranking on each criterion. You have to crack the code & try and improve on the criterion in which we lack: FM Arun Jaitley

सत्ता आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत पहिल्या ५० देशांमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले होते. आज आपण ७७ व्या स्थानी पोहोचलो आहोत असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button