breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कंगना रनौतनंतर फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा रडारवर, अनधिकृत बांधकामासाठी बीएमसीची नोटीस

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिलमधील ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा मुंबई महापालिकेच्या रडारवर आहे. आपली रहिवासी जागा बेकायदेशीरपणे व्यावसायिक मालमत्तेत रुपांतरित केल्याबद्दल बीएमसीने मल्होत्राला नोटीस बजावली आहे. पाली हिल भागात कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मनिष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर महापालिकेने आक्षेप नोंदवलेला आहे.

मनिषला ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. त्याच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे. बंगल्यातील व्यवस्थापन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर विभाजन, केबिनची उभारणी, मूळ रचनेत अनधिकृत फेरफार किंवा शेड तयार करुन बांधकामात अनधिकृत भर घालणे, अशा बदलांकडे महापालिकेने लक्ष वेधलेले आहे.

व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले होते. एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवलेली आहे. बेकायदा बांधकामे का पाडली जाऊ नये, यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम 475 अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिशीत लिहिलेले आहे.

कोण आहे मनिष मल्होत्रा?

  • बॉलिवूड, हॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट
  • 1990 पासून फॅशन डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात
  • बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांचा स्टायलिस्ट 
  • 1998 मध्ये मॉडेलिंगही केले
  • 2005 मध्ये “मनिष मल्होत्रा” या नावाने स्वतःचा ब्रँड सुरु, मुंबई आणि दिल्लीत स्टोअर
  • फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button