breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हायफ्लो मशीनला थेट मंजुरी : राष्ट्रवादीची नगरसेविका संशयाच्या भोवऱ्यात?

पिंपरी| प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने थेट पद्धतीने खरेदी केलेल्या हायफ्लो मशीनला विरोध करणाऱ्या संत तुकाराम नगरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचा अचानक विरोध मावळल्याने त्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. बुधवारी (दि.9) झालेल्या स्थायीच्या सभेत या विषयाला मंजुरी दिली जात असताना ‘मुग गिळून गप्प’ बसल्या होत्या. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसाठी Inspired o2 FLO – High Flow Nasal Oxygen Therpy Equipmene या मशीनचे १३० नग थेट पद्धतीने मे. स्मिथ मेडिकल इंडिया प्रा. लि. या उत्पादित कंपनीचे अधिकृत विक्रेते मे. ड्रग हाऊस पुणे यांच्याकडून घेण्याचा निर्णय घेतला होता. हा विषय दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी आल्यानंतर त्यांनी आक्षेप घेत सभेत गोंधळ घातला होता.

मध्यवर्ती भांडारचे अधिकारी व ठेकेदार महापालिका तिजोरीवर डल्ला मारुन लुटली सुरू आहे. त्यांच्या आक्षेपामुळे थेट खरेदीचा विषय तहकूब करण्यास भाग पाडले होते. माञ, दोन आठवड्यात अचानक काय झाले. त्यानंतर बुधवारी (दि.९) हा विषय पुन्हा स्थायीकडे मंजूरीसाठी आल्यानंतर शिलवंत यांनी त्याला आक्षेप न घेतल्याने हा विषय मंजूर करण्यात आला.

स्थायी समितीमध्ये जोरदार विरोध दश॔विणा-या आणि आयुक्तांना निवेदन देऊन उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरसेविका शिलवंत यांच्यात अचानक एवढे बदल कसे झाले. याबाबत उलट सुलट चचां सुरु आहे. ठेकेदाराने या दोन आठवड्यामध्ये अशी कोणती किमया केली ज्यामुळे शिलवंत यांनी अचानक मौन बाळगले यावरही चर्चा रंगल्या.

दरम्यान, महापालिकेच्या आर्थिक नुकसानीसाठी नव्हे तर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी विरोध केला होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. स्थायी समितीच्या नगरसेविका शिलवंत यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button